STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Others

3  

Samiksha Jamkhedkar

Others

गुरु🙏🙏

गुरु🙏🙏

1 min
207

गुरुवीण नाही ज्ञान

गुरुवीण नाही जान ।

देई दिशा, मार्ग गुरु

सर्वांना करती सज्ञान।


अक्षर शिकवी बाराखडी

शुद्ध मराठी व्याकरण।

छडी लागे छम छम तेंव्हा

विद्या येई घमघम।


देई मनास आधार

मातीच्या गोळा आकार।

सर्व विद्यार्थ्यांचे करती

गुरु स्वप्न ते साकार।


कधी रागाने ओरडा

शिकवता जीव कोरडा।

मायेचा हात कधी फिरवी

रागावता बालका जीव होई 

थोडा थोडा।


तुमचे आभार गुरुजी

दिला जीवना आकार।

जिद्दीने शिकून मी लवकरच

करील तुमचे स्वप्न साकार।


Rate this content
Log in