STORYMIRROR

शिल्पा म. वाघमारे

Others

3  

शिल्पा म. वाघमारे

Others

गुरु महिमा

गुरु महिमा

1 min
225

कर्तव्याची आम्हा

करुन देण्या जाण

झिजवत स्वदेह

चंदनासमान... १


तिमिरात अज्ञानाच्या

गुरु लाभेना शोधून

मात्र कुण्या जन्माची ही

माझी पुण्याई महान... २


गुरुमहिमा वर्णावया

यत्ने शब्दांची गुंफण

अल्पमती शब्दांवरी

गुरु पियुषी शिंपण... ३


अहोभाग्य हे लाभले

धन्य धन्य हे जीवन

दिव्य तेजात मी न्हाले

कसे फेडावे हे ऋण... ४


वाट सम्यक ज्ञानाची

मज दाविली आपण

गुरु महिमाच थोर

देवाहुनी जो महान... ५


साऱ्या धनांहुनी अनमोल

जीवा लाभले हे धन

लक्ष्य जन्माचं साधलं

पदरी साफल्याचं दान... ६



Rate this content
Log in