STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

*गुंफण प्रेमाची*

*गुंफण प्रेमाची*

1 min
205

रोजच भेटतेस गं मला

किती तरी हा रोज वेगळेपणा

गुंतत चाललो मी मी तुझ्यात

नित्य तुझा हा नवखेपणा...


नित नवी नवी भासे मला

मनाच्या कोपर्‍यात छान डुले

तुझ्या वाटेवर मग मी ग 

गुलाबांच्या पायघड्या घाले...


सांजसमयी आवरून यायची

सूर्यास्तास माझ्या भेटीला

प्रेमाचा झरा वाहायचा

स्पर्शातून ग तुझ्या...


अबोल नयन तुझे हे

कातर वेळेत व्हायचे बोलके

चेहर्‍यावरील लाली तुझ्या

चुंबावी वाटे मज हलके...


गुंफण प्रेमाची आपली ती

नित नवी नवी भासे मला

कवेत घे ग सजणी आता

अखंड प्रेमात ठेवीन तुला...


Rate this content
Log in