गुणवत्तेचा आहे राडा...!
गुणवत्तेचा आहे राडा...!
गुणवत्तेच्या बाजारात
ज्ञानाचा पसारा मांडला
विद्येच्या नावाखाली
पैशाचा खेळ रचला
विद्यार्थी शिक्षक मेळावा
कुणाची गरज कोणास
लागला प्रश्नांचा ढेर
गंज असा विचारास
विद्येचे मंदिर भविष्य
जात पात राखतात
शिक्षणाच्या अंताचा
असा घाट मांडतात
प्रवेशाचं मेरिट धुळीत
प्रवेशाचा नुसताच डंका
बुद्धिमत्तेचा सगळा गुंता
निर्जीवात जान फुंका
गुणवत्तेची आज ग्वाही
परीक्षेच्या आहे दबावात
व्यक्तिमत्वाचं नाही कुठे
नामोनिशाण चारित्र्यात
दान आहे येथे विकत
गुणवत्तेचा आहे राडा
नव ज्योती बुझवणारा
डाव आता हाणून पाडा
