गुंडाळ गाशा
गुंडाळ गाशा
1 min
141
पळणारा डिसेंबर
सापडत नाही मुठीत
येत नाही मिठीत
तो जातो आठवणींच्या
कुपी वाटीत
काही सुखाच्या काही दुःखाच्या
काही आनंदाच्या काही भाग्याच्या
आपण फक्त मनाच्या
तळाशी जपून ठेवायच्या
कधी त्या अधून-मधून
उघडून बघायच्या
सु:खे दु:खे समसमा म्हणत
पुन्हा अनुभवायच्या
पण नाही खंत करायची
नवी उमेद धरायची
बाळगायची नवीन आशा,
आणि जुन्या वर्षाला
म्हणायचे तू आता गुंडाळ गाशा
