गुलमोहर
गुलमोहर
1 min
255
गुलमोहरा
ऐकांती बहरावा
जसा वणवा
रखरखत्या
उन्हात जळणारा
जसा निखारा
तुज पाहता
नव उभारी मिळे
तु उन्ही जळे
नभावरली
तुझी चढली लाली
डोंगरमाथी
स्पर्धा सुर्याशी
करीत असे लाली
तुजवरली
तु शोभे असा
मळवट भरला
धरेने जसा
गुलमोहरा
तू सा्वली देतोस
शेतकऱ्यास
नवीन आशा
कष्टास त्याच्या देते
नवी ही उषा
