STORYMIRROR

Sonam Thakur

Others

2  

Sonam Thakur

Others

गुलाबजाम

गुलाबजाम

1 min
81


पाककृती विषय माझ्या आवडीचा

सर्वाना आनंदाने खाऊ घालण्याचा

सारे म्हणतात तुझ्या हातात आहे जादू

४-५ गुलाबजाम आम्ही सहज खाऊ


फार काही नाही अगदी सोपी पद्धत सांगते

पनिर माव्याच्या मिश्रणाचे गुलाबजाम मी बनवते

थोडी वेलची पूड अन् ड्रायफ्रूट पावडर मिक्स करते

आवडीचे संगीत ऐकत त्याचे गोळे करते


तेलात छान तळून घेऊन 

साखरेच्या पाकात घोळवते

बदाम पिस्ताचे काप करून       

छान त्यांना भांड्यात सजवते


नैवेद्य दाखवून मी देवाला 

घरच्या मंडळीला खायला दिले

खाऊन सारे करती वाह वाह

म्हणती असा योग नेहमीच यावा


Rate this content
Log in