STORYMIRROR

Shobha Sanjay Bavdhankar

Others

4  

Shobha Sanjay Bavdhankar

Others

|| गुलाबी थंडी ||

|| गुलाबी थंडी ||

1 min
362

थंडीने केला कहर

प्रेमाला आला बहर


गवतावरचे दवबिंदू, मोती हिरवे पाचु

मागे वळुन बघता गोड गाली हसु


समोर घनदाट धुक्याचा रस्ता

तिचा हात हातात घेतला हसता हसता


ओठांवर ओठ टेकले

शब्दही गारठुन गोठले


मखमली स्पर्शाने नाते झाले घट्ट

नको स्वेटर कानटोपीचा हट्ट


गुलाबी थंडीचा अंगावर राहु दे शहारा

थंडगार सुगंधी सुटला वारा


धुके झाले विरळ, त्याने केले बंड

वाफाळलेला चहा, वाटु लागला थंड

नयनरम्य हे क्षण, मन झाले धुंद


दाटला गारठा हवेत

तु हवीच माझ्या सवेत

क्षणात घेतले कवेत


जादुगार ही थंडी, म्हणावे का तिला प्रेमाचे सार

किमया हि तिची, प्रत्येक मनाला करते टवटवीत हिरवेगार ||



साहित्याला गुण द्या
लॉग इन