STORYMIRROR

Umendra Bisen

Others

3  

Umendra Bisen

Others

गुलाबी थंडी

गुलाबी थंडी

1 min
170

आले थंडीचे दिवस

होतो बदल हा नवा

ऊन कोवळे सकाळी

रात्री पडतोय गारवा.


जसा वाढतो गारवा

आठवते ती शेकोटी

शेक घेता शेकोटीची

होतो हर्ष कोटी कोटी.


जुन्या काळाचा साधन

आहे शेकोटीची शेक

शेकोटीची थंडीमध्ये

मजा घेतोय प्रत्येक.


थंडी गुलाबी गुलाबी

होते धुक्याची पहाट

गावं शहरं ठीकाणाचा

बंद पडे वही वाट.


येता थंडीची दिवस

वाटे ते आल्हाददायी

दृश्य रम्य निसर्गाचा

मन खुलवून जायी.


साहित्याला गुण द्या
लॉग इन