STORYMIRROR

शिल्पा म. वाघमारे

Others

3  

शिल्पा म. वाघमारे

Others

गुलाबी हवा....

गुलाबी हवा....

1 min
239

रजा शरदाने घेता

आला हेमंत शिशिर

चुणुकली ही गुलाबी 

थंडी भरे शिरशिरं... १


लागे चाहूल थंडीची

शाल धुक्याची धवल

अमृताचं लेणं ल्याली

रुप सृष्टीचं सजलं... २


श्वास भिजला श्वासांत

देई साद गोठलेला

विरघळे जीव जीवा

मीठीमध्ये थिजलेला... ३


तुझा सहवास मज

वाटे प्रिया हवाहवा

देही झोंबता गारवा

चेतवतो रे वणवा... ४


तनु पुन्हा शहारली

मधू प्रीत जीवघेणी

सेज सजलेली ये ना

गाते मारवा यामिनी... ५


मंद गुलाबी हवा

सजलेली रातराणी

धुंदीत रंगू दे निशा

मोहरल्या या क्षणी... ६


Rate this content
Log in