गुलाब
गुलाब
*एकदा फिरायला बागेत गेले*
*लाल गुलाबांचे रान पाहिले*
*रानामधे लाल गुलाब कळ्या*
*धुंद होवून पाहतच राहिले*.....
*सान कळ्यांना राखत होते*
*टोकदार सान ,छोटे काटे*
*हिरवीगार छान छान पाने*
*गुलांबांचा झोकाच मस्त वाटे*...
*झुलतात गुलाबफुले वार्यावर*
*सुगंध पसरवतात माळरानावर*
*टपोरी टपोरी लाल ही उमलली फुले*
*दिमाखात शोभतात हरीत पानावर*.....
*गुलाबाचे फूल आहे फुलांचा राजा*
*स्तुती करावी त्याच्या मनमोहक रूपाची*
*काट्यातून, पानातून फूल डोकावते वर*
*काय वर्णावी थोरवी फुलाच्या गुणाची*....
*लाल लाल गुलाब छान छान फुलला*
*गुलाब फुलांचा हार देवाला बनवला*
*मुलींनी लाल गुलाब केसात माळला*
*सजावटीसाठी छान फुलदाणीत सजवला*....