गुलाब फुलांची याद
गुलाब फुलांची याद
1 min
275
गुलाब फुलांची याद स्मरते
माझे मन शुभेच्छेने मी भरते
शब्द फुलांचे भाव सुमने साधूनी
करते हितगूज या शब्दपुष्पानी।।
अखंड प्रीत राहो चराचरी
बहरती बाग प्रेमळ सुखाची
ज्योत जळते जिव्हाळ्याची
लता वेलीवरी फुले भावनेची।।
अक्षर हे दृढ नेतृत्वाची धनी
महत्तम कार्य असे सदा मनी
करी समाधान प्रेम वरदानी
सुर मिळे निमित्याने शुभ दिनी।।
