गुगलच्या युगात
गुगलच्या युगात
1 min
350
शेंदूर फासून दगडाचा
झाला का कधी देव
सोडा सोंग झोपेचे
सांगा कधी येणार चेव
संस्कृतीच्या नावावर
मेंदू तुमचा गहाण झाला
विचारांच्या क्षमतेचा
भगाकर शून्य आला
मंदिराच्या पायरीवर
का दिसतात भिखारी
शेतात पिकवून सोनं
शेतकरी कर्जबाजारी
गुगलच्या युगात घ्या
रोज नवे नवे धडे
तुमची प्रगती तुम्हीच करा
टाका एक पाऊल पुढे
