Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Samiksha Jamkhedkar

Others

3  

Samiksha Jamkhedkar

Others

गुढीपाडवा

गुढीपाडवा

1 min
239


स्वागत या नववर्षाचे

करूया आनंद उत्साहाने

झालर सुखाची लावूनी

गुढी उभारू नव्या संकल्पाने-१


शिशिरातली पानगळ झडुनी

वसंत फुलला नव्या बहरांनी

राम आयोध्येसी आले परतुनी

आजच्या मंगलमय शुभदिनी--२


नवे संकल्प नवीन आशा

नवीन विचारांची नवीन दिशा

दुःख,मरगळ जाऊनि सगळे

सुखी जीवनाची नवी परिभाषा--३


साडेतीन मुहूर्तापैकी एक

पाडवा हा शुभ मुहूर्त

शुभ कार्याला करोनि सुरुवात

सुखात जावे सगळ्यांचे वर्ष--४


विजयाचे प्रतीक गुढी उभारू दारी

गाठी, हार, आंब्याची डहाळी

गुढीला काढू स्वतीक लावू चंदन

मनोभावे हात जोडून करू वंदन


Rate this content
Log in