गतकाल
गतकाल
1 min
178
गतकाल
खरचच जगले
सुखदुःखाचे प्याले रिचवले
या गतकालात खूपकाही अनुभवले..
गतकाल
कोरोना विषाणूचा
पूर्ण जगतात खूपच
झाला होता कोरोना त्रासाचा...
गतकाल
माणूसपण हरवले
पण कोरोना योद्ध्यांनी
कोरोनाशी लढायचे मनाशी ठरवले...
गतकाल
भीती दडपणाचा
कोणाला काय होईल?
नित्य पगडा या विचाराचा....
गतकाल
खर्च नाही
पैसा हातात नाही
मानव त्यातच भागवणे पाही...
गतकाल
नाही शाॅपिंग
नाही सहलीला जाणे
हाॅटेल बंद नाही हाॅटेलींग....
गतकाल
हिंदोळा सुखदुःखांचा
सजला मेळावा घरातच
क्षण घालवला मुलाबाळात आनंदाचा..
