गतकाळ
गतकाळ
1 min
250
थोडे सुखात थोडे दुःखात
गेले हे वर्ष परी अंतात
सुरू जाहले अजबच
वाटले नवते खरच
उलगडले मनाचे कोडे
जरा कठीणच थोडे
संमिश्र स्वरूपाचे पण
घेऊन आले आल्हादायक क्षण
नवी दुनियादारी नवा परिसर
सगळाच छान छान खरतर
लेखणी लाभली सौभग्याने
मनी ध्यानी नवते दिलें नियतीने
वनवास सरला एकटेपनाचा
जमला गोतावळा प्रेमाचा
खूप दिले खूप काही हिरावले
आभारी मी हया वर्षाची ज्याने प्रगतीचे द्वार उघडले
