ग्रीष्मातले ऊन
ग्रीष्मातले ऊन
1 min
6
आताच जन्मलो होतो अन्
दवांनी पांघरली चादर
बोललो नाही मुळीच काही
असा झालो मी सादर
परिक्षेला तोंड द्यावे
पोटातच शिकलो मातीच्या
परिस्थितीशी जुळवून घेणे
मनात इथल्या नियतीच्या
उभा होतो रोऊन मुळे
अस्तित्वाच्या लढाईला
थेंब थेंब एकवटला
आयुष्याच्या चढाईला
जुळवून घेण्यासाठी मी
मोडलेत नियम सारे
सोसलेत जगण्यासाठी
ग्रीष्मातले ऊन वारे