गरीबीचं जीणं
गरीबीचं जीणं
1 min
242
गरिबीचा मुक्काम झोपडीत
घरावर फाटकं छत असतं...
संघर्षाचं जगणं,
अर्धपोटी जेवणं, ठिगळानं
संसार झाकलेला असतो...
अन्नासाठी धावाधाव,
पैशासाठी लाचारी,
वेदनेचं दुःख सतावत असतं,
भुकेचा नेहमीच त्रास असतो...
जमिनीचं अंथरुण, आकाशाचं पांघरुण,
निजेला धोंडा,
शिक्षणाचा अंधार,
स्वप्नात भाकरीचा चंद्र असतो...
कोपऱ्यात देव्हारा, घरात पसारा,
फाटका तुटका निवारा,
चिंतेत आयुष्य असतं
जगण्याचा केवळ पाठलाग असतो...
