STORYMIRROR

Shila Ambhure

Others

3  

Shila Ambhure

Others

गरीबी

गरीबी

1 min
171


( मुक्तछंद)


खेळणी खेळण्याचे

लुसलुशीत हात तुमचे कोवळे

धरता लेखणी झरतील

अक्षरांचे मोती पोवळे


पण तेच नाजूक हात

गेलेत रापून,

पडलेत घट्टे त्यांना

कष्ट अपार करून.


माय-बाप आम्ही

आहोत कमनशिबी

पदरात घातली तुमच्या

करंटी ही गरीबी.


दारिद्रयाने गांजले आम्हास

मिळतो ना पोटभर घास

कामविना घडेल साऱ्या

कुटुंबास उपवास.


म्हणून बाळांनो,

करावे लागते तुम्हालाही काम

खळगी भराया पोटाची

कमवावे लागते दाम.


कामासाठी जेव्हा

गळेल अपुला घाम

तरच मिळेल 

पोटाला आराम.


माफ करा चिमुकल्यांनो

आम्ही देऊ शकलो केवळ दुःख

पण ध्यानी असू दया जरा

कर्म हीच पूजा खरी मिळवाया सुख.


Rate this content
Log in