STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

ग्राऊंड...!

ग्राऊंड...!

1 min
433


ग्राऊंड हा शब्द इतका

हृदयात घट्ट रुतून बसलाय

की ग्राऊंडला मराठीत

क्रीडांगण म्हणतात हे विसरून गेले...!


आणि या मैदानी खेळांनी

पण अशी दडी मारली की

क्रिकेटच्या वेडाने जणू

साऱ्यांना हद्दपारच केले...!


ग्राऊंड दिसले की फक्त

आजकाल क्रिकेटच आठवते

आणि रणजी लीग करत करत

थेट वर्ल्ड कपावर गाडी येऊन थांबते...!


जळी काष्टी पाषाणी

ग्राऊंडचा या खेळाने ताबा घेतला

आणि इतर खेळांनी केंव्हा

काढता पाय घेतला ते कळलेच नाही...!


मोजकीच युवा मंडळी

प्रसार माध्यमातून झळकू लागली

इतर तरुण पिढी मात्र

अंघोळ न करताच टीव्ही समोर बसू लागली..!


देशी खेळ नजरे आड झाले

व्यायामाचे ही मॉल निघाले

तरुण पिढीचे आरोग्य धोक्यात आले

प्रगतीने इथे मात्र हात टेकले...!


वाटते दिखाव्याची दुनिया

फारच विस्तारली

सात्विक जीवनाची खरोखरच

घडी मात्र विस्कटली....!


फायदा तोटा देवच जाणे

पण जीवन मात्र जगणे झाले उणे

आंनदाचे क्रीडांगण झाले सुने सुने

ग्राऊंडचे वाजता टीव्हीवरी तुणतुणे....!


साहित्याला गुण द्या
लॉग इन