STORYMIRROR

Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

ग्रामीण काळीज...

ग्रामीण काळीज...

1 min
133

हार जीत शर्यतीचा जरी गोंधळ 

मनामनात सहप्रेमाचा ध्यास 

गाव शहर भेदाभेद होतो क्षीण 

अंतिमतः काळजीचा घास...


रम्य दिवस उजडे पहाटेचा 

ग्राम सगळ्यांच्या मौजमजेचा 

सुख दुःखात नेहमी आनंदी 

मनापासून ध्यास जगण्याचा...


माळरानावरची झाडं, झुडपं 

गुरंढोरं नि किलबिल पक्षीमित्र 

सगळेच प्रिय लेकरांसमान 

काळजातलं प्राणप्रिय चित्र... 


राबतात शेतात काही नोकरीत 

फेरफटका मारण्यास शहरी जाता 

विसरत नाहीत कुटुंबकबिलास 

शहराची वासना पोटापायी होता... 


सरळ सोपं ग्रामीण जीवन 

बीज अंकुरित राहणीमान साधं 

मनमिळाऊ स्वभावाची माणसं 

विचारांनी एकसमान बागडणं... 


Rate this content
Log in