STORYMIRROR

Sangita Pawar

Others

4  

Sangita Pawar

Others

गोपाल काला

गोपाल काला

1 min
209

श्रावण मासा वद्य अष्टमीस

श्रीकृष्ण मथुरेत प्रकटले

धन्य झाले वसुदेव ,देवकी

कंसापासुनी त्यास लपविले ||१||


करते साजरी जन्माष्टमी

पौराणिक असे ही प्रथा

साजरा करतात उत्सव

गोपालकाल्याची कथा ||२||


दहीदुधाने भरलेला हंडा

गोविंदाचा साहसी खेळ

मानवी मनोऱ्यावरून

मडके फोडण्याचा मेळ ||३||


गोविंदा आला रे गोपाला

गोकुळात आनंद झाला

गित गातात लहान -थोर

साजरा करी गोपालकाला ||४||


थरावर थर ते लावूनी

करती जीवाशी करार

बांधूनी उंच दहीहंडी

बोली लावती हजार ||५||


माने विष्णूचा आठवा अवतार

श्रीकृष्णाचे करुनी स्मरण

बाललीला ,नीती ,प्रेम ,त्याग

या सर्वां आपण करू नमन ||६||


Rate this content
Log in