गोजिरी स्वप्नपरी
गोजिरी स्वप्नपरी
माझ्या छकुलीचे लाड
मी आयुष्यात पुरविण
तिला मी वात्सल्यात
फुलासारखी हसत ठेविण...
दोघांच्या या प्रेमाची छबी
कमल नयनी माझी हिरकणी
दिसते कशी नाजूक कळी
मध मोहोळाची मधूर हनी...
लाभो आरोग्य या जीवनी
शिक्षण देईन माणुसकीचे
यश संपदा किर्तीचा कौल
मंगल गान भविष्याचे...
परी माझी प्रेमळ निर्मळ
आहे गोजिरी स्वप्नपरी
आली माझ्या जीवनी
घेवूनी अमृताच्या धारी...
जन्मताच कळशी माझी
प्रेमाने ओतप्रोत भरली
मर्मबंधातली असुया
पुर्ण आनंदाने वेचली...
मागेमागे कशी फिरते
काना कोपरात लपते
डाव आला की कशी
मुळूमुळू रडूबाई रडते...
नखशिखांत लावण्य
वेडेवाकडे डोलणे
बेभान वाऱ्यासम
तिचे दुडूदुडू धावणे...
रडून भडून करते परी
आपलेच खोटे अन् खरे
नाही घाबरत जराही
मोठ्यांनाही सुटती घाबरे...
