STORYMIRROR

Shila Ambhure

Others

4  

Shila Ambhure

Others

गोजिरी पोर

गोजिरी पोर

1 min
124

गोजिरी मी

गोड पोर

आईसाठी

उगा घोर


हात माझा

हाती धरी

नेई मला

कामावरी


धरूनिया

ती हातोडी

घाली घाव

शिळा फोडी


अंगभर

वाहे घाम

असे तिचे

जड काम


पाहुनिया

तिचे कष्ट

बालमन

झाले रुष्ट


घेतला मी

हाती घण

मिळवाया

थोडे धन


माय आली

ती धावून

घण दिला

तो ठेऊन


बोले 'पोरी

हे गं काय

धरू नको

घण बाय'


हसुनिया

मी बोलले

'कष्ट किती

तू सोसले'


'लागो तुला

हातभार

गोजिरी मी

तुझी पोर'


साहित्याला गुण द्या
लॉग इन