गोगलगाय
गोगलगाय
1 min
394
आला पावसाळा
दिसे गोगलगाय
मंद मंद चाल
पोटा मधी पाय ।।
ओझे घेऊन पाठी
अंगणभर फिरे
होता थोडा स्पर्श
घरामध्ये शीरे ।।
इवलीसी मान
छोटसं ते अंग
डौलदार दिसे
तुझे दोन सिंग ।।
उन्हाळ्यात सांग
आसतीस कुठं
कसे मग भरती
आपले ते पोटं ।।
गोगलगाय तुझे
नाव लयभारी
पाठीवर शंख
रानात सवारी ।।
