गोड खाणारा बाळ
गोड खाणारा बाळ
एकदा आमचा बाळ उन्हात बसला
चिऊ ताई ला बघून खुदकन हसला
चिऊ म्हणे बाळाला येतोस का घरी
बाळ म्हणे ताई तुझं घर दाखव तरी
चिऊ गेली बाळाला घरट्यात घेऊन
काऊ तिथे बसला होता दारू पिऊन
चिऊ च्या पाळण्यात बाळ जाऊन बसला
पाळण्याचा दोर काऊच्या गळ्यात फसला
चिऊ म्हणे काऊला मोठा आला दारू पिऊन
माझा बाळ खूप मारेल तुला पेकाट धरून
काऊ म्हणे मला माफ कर चिऊताई
या पुढे मी कधीच इकडे येणार न्हाई
बाळाने काऊ ला दोरा तुन सोडले
त्याच्या घरी जाऊन घरटेच मोडले
चिऊ म्हणे बाळाला तुझे उपकार कसे फेडू
बाळ म्हणे तुझ्या डब्यातून आण एक लाडू
लाडू घेऊन बाळ घरी परत आला
आई म्हणे लाडू तुला कोणी दिला
बाळ म्हणे गोड मागितलं तू देत नाई
मग मला लाडू देते आमची चिऊताई
