गणराया
गणराया
1 min
249
सुरू झाली लगबग लहान थोर साऱ्यांची
मिळूनी सारे करु लागले तयारी बाप्पाच्या स्वागताची
उधळीत गुलाल अन् फुले थाटात आले गणराज
साऱ्यांच्या मनावर बाप्पा गाजवतोय अधिराज
गणपती बाप्पा आले आपुल्या घरी
रांगोळी अन् तोरणं साऱ्यांच्या दारी
मखरात बाप्पा ऐटीत बैसूनी
ठेवितो लक्ष साऱ्यांवर हसूनी
आपल्या लाडक्या बाप्पाच्या आवडीचे
नैवेद्य घरोघरी होऊ लागले मोदकाचे
करुनी मनापासूनी गणेशास स्मरण
मनीची इच्छा होते सारी पूर्ण
गणराया तू विघ्न दूर करणारा विघ्नहर्ता
अन् दुःखाचा नाश करणारा तूच दुःखहर्ता
