गणराज
गणराज
1 min
28.6K
गणराज आमचा येवून गेला
निरोप आमचा घेवून गेला
भाव मनातले जाणून गेला
गणराज आमचा येवून गेला
चैतन्य मनामनात जागवून गेला
मरगळ मनाची झटकून गेला
आशिष साऱ्यांना देवून गेला
गणराज आमचा येवून गेला
उदास मन करून गेला
परत येतो सांगून गेला
डोळ्यात पाणी देवून गेला
गणराज आमचा येवून गेला
परतीचा पाऊस देवून गेला
परिसर सारा फुलवून गेला
गणराज आमचा नाचत आला
नाचत नाचतच निघून गेला
