गणराज आले
गणराज आले

1 min

209
श्रावणाच्या सरी
लागल्या ओसरू..!!
गणराज आले
झाला हर्ष सुरू..!!
आगमनी तुझ्या
सजला शृंगार..!!
विद्येचा देवता
महिमा अपार..!!
रूप तुझे गोड
चढे भक्ती रंग..!!
नको मज काही
हवा तुझा संग..!!
येणे तुझे मज
वाटे सुखदायी..!!
मस्तक झुकते
सदा तुझ्या पायी..!!
दुःखाच्या क्षणात
धावून येतोस..!!
साऱ्याच भक्तांना
आनंद देतोस..!!