STORYMIRROR

कवी सुभद्रासुत- सं.बा.आंधळे

Others

3  

कवी सुभद्रासुत- सं.बा.आंधळे

Others

गणपती विसर्जन

गणपती विसर्जन

1 min
194

तिथी गणेश चतुर्थी

आग्रहाच निमंत्रण।

मुर्तीरुप गणेशाचं

शुभदिनी आगमन॥१॥


मुर्तीपूजा दररोज

आणि आरती भजन

देती नैवद्य प्रसाद

भक्तीभावे शिष्यगण॥॥२॥


असा उत्सव उत्सव

मनोभावे संवर्धन।

दिन अनंत चतुर्थी 

मुर्तीरुपा विसर्जन।॥३॥


गावामधे मिरवती

मुर्ती वाजत गाजत।

भक्त उत्साई आनंदी

वाद्य तालात नाचत॥४॥ 


जयघोष गणपती

घुमे सर्वत्र आवाज।

एकोप्याची संकल्पना

मन प्रसन्न रिवाज॥५॥


होऊ नये विटंबना 

असा शास्रीय निर्धार।

फक्त मुर्तीला निरोप

पाणी निसर्ग आधार॥६॥


मुर्ती शाडूची देखणी

नाही करीत जतन।

शाडू मातीचं पाण्यात

भक्तीभावे विघटन॥७॥


साहित्याला गुण द्या
लॉग इन