STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Others

2  

Meenakshi Kilawat

Others

गणपती बाप्पांचे मनोगत"*

गणपती बाप्पांचे मनोगत"*

1 min
461

आलोय मी पृथ्वीवरती

भक्तांच्या हाकेने धावत खाली

दिसेना आज खरी श्रध्दा कोठे

घोर भ्रमनिराशा होऊ लागली..!!१


नकली रंग नकली प्लास्टर,डस्टर 

रूप माझे मज नकली वाटते

जिकडे तिकडे माती असूनी

मुर्ती कशी माझी कडकडते..!!२


अतीशय आवडते दुर्वा मजला 

परंतू दिसत नाही हिरवळ कोठे

नको ढोलताशा लाउडस्पीकराचा

गजरात ऐकू येईना भक्तांची हाक इथे..!!३


अस्वच्छता दिसते मजला जागोजागी 

प्रसाद माझा तुडवती लाथेखाली

सागर सरितेत विसर्जन का करता?

पाहूनीया काया माझी तडफडली..!!४


गणेश चतूर्थीला स्थापना करूनी 

असु द्या ह्रदयातून शुद्ध मनिषा मनी 

भक्तिभावाची फुले वाहूनी 

बोलवा मजशी सदैव दर्शनी..!!५


गावानगरात स्वच्छता राखूनी

नैवेद्य मोदकाचा लावा भावभक्तीने

सेवासुश्रुता गरजूंची करी श्रध्देने

प्रसन्न होईल मी शुद्ध वातावरणाने..!!६


Rate this content
Log in