गणेश भोग
गणेश भोग
1 min
133
*सोन्याचे हे केळ लाडू*
*बाप्पा दाताने चावतील कां?!!१!!*
*बघून डोळ्याने नुसतं,*
*पोट तुमचं भरतील कां!!२!!*
*कोणी शोधले हे नवें फॅड*
*दुःखं दारिद्र्य घालवील कां?!!३!!*
*बोलाचीच कढी नी भात,*
*सांग खरे हे ठरतील कां?!!४!!*
*पिडवणूक हे गरीबाची देवा,*
*धंद्या पायी हे थांबवशील कां?!!५!!*
*सारा पैशाचाच हा बोलबाला,*
*देवा तुलाच रे पाहावेल कां?!!६!!*
*संतदास म्हणे बाप्पा तू सांग,*
*गरीबाच्या खिशाला हे परवडेल कां?!!७!!*