STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Others

4  

Meenakshi Kilawat

Others

गंंध मातीचा

गंंध मातीचा

1 min
175

अमृतधारांच्या या वर्षावात

फुटती मनात उत्साह धारा                

नवसंजीवन देती नवआशा   

गंध मातीचा देतो नवघुमारा।।


झरझर येती मृृृगधारा

शांतवितो हा जग सारा

मनी भरतो उत्साह नवा

सुर्याचा संपतो उष्णपारा।।


सुखविती या मृृृगधारा

आनंदी होतसे भूमाता

जनमन हर्षूनी मनोमनी

गंध मातीचा दर्प येता ।।


लागतो बळी कामाला

लगबग करतोय जोमात

हुंकारती दाही दिशा सुगंधाने

मस्त सूर्यचंद्र हसती गालात।।


तहनलेली ही वसूंधरा

प्राषन करी अमृतधारा

चिंबचिंब न्हाउनिया

भरतो गंध मातीचा संसारा।।


पाऊस येता गंधाळली माती

मोर नाचतो कोकिळ गातो

जन्म घेवूनी पाउस येतो

चर अचराचे कल्याण करीतो।।


Rate this content
Log in