गंधीत वाटा
गंधीत वाटा
1 min
387
गंधीत वाट ती लाजत, मुरडत.
आली अलगद माझा शोध घेत.
प्रेम, जिव्हाळा, नात्यांची बरसात.
नववधू स्वप्नसुंदरी साज शृंगारात.
गुलाबी थंडीत मऊ दुलईत भेट.
ह्दयाच्या स्पंदनी वंसत फुलेगाठ.
मधुचंद्र मिलनाची मंतरलेली रात्र.
नाते जन्मातंरीचे भेटीस आतुर नेत्र.
आशा आकांक्षा गुलमोहर बहरत.
स्वप्न झुलाच्या हिंदोळ्यात डोलत.
शीतल चांदण्यात पारिजात बरसत.
रातराणीच्या सुगंधात मन मोहरत.
गंधीत वाटा स्वप्नपूर्तीस मोहरणारे.
वास्तवाचे चटक्यात आयुष्य झुंजणारे.
मृगजलाच्या भासात जीवन गाणारे.
गुंतले प्राण स्पर्शगंधात लखलखणारे.