गंधाळली प्रीती
गंधाळली प्रीती
प्रेमाच्या या वेलीवरती
ही गंधाळलेली प्रीती
होता नभी स्फुरण किरण
लाली अंगनात सरसरूनी
झनी सुगंध दरवळूनी येई....
प्रसन्न या वातावरनी सख्या रे
चढे धुंदी मद्याविना मनी रे
झुलु दे मजला पाखरू होवूनी
गाते मी मंजुळ जीवनगाणी
हृदयी जपेन तुझी उतराई...
उजळोनी सौख्याची दिप्ती
जळते या हृदयात ज्योती
वैभव तुझ्या प्रेमाचे वसले
हवे ते मजलासी मिळाले
मी उत्कर्षाने न्हाउन जाई.....
मनोमिलनाची झुळूक वाहते
उल्हास मनी हा दरवळते
आजन्म दरवळत राहू
तळपू आपण दोघे साहू
सह संगत शितल होई....
