गंध तुझा प्रीत माझी
गंध तुझा प्रीत माझी
1 min
399
अचानक भेटली तू आज
धडकी भरली माझ्या मनात
रूप तुझे बघून
साठवले हृदयात माझ्या
बघता तू एक क्षणी मजकडे
जादू केली तुझ्या नजरेनी
हृदयात माझ्या उमलले प्रेम तुझे
ओठवरी नाव तुझे ग प्रिये
गंध तुझा प्रीत माझी
गुलाबाची कळीपण लाजते बघून तुला
तू हसतेस तेव्हा चंद्रासारखी भासते
पैंजणचा आवाज तुझा
भारी मज वाटतो ग
रूप तुझे देखणे प्रिये
नजरेत भरून घेतो ग
स्पर्शाने तुझ्या मन माझं शहारला ग
बघितले तुला आज मी
नव चैतन्य मनात साठलं गं
