गझल..भोग प्राक्तनांचे
गझल..भोग प्राक्तनांचे
पानांफुलात रमणे, फुलणे खरेच दिसणे
अन् भोग प्राक्तनांचे, मी पाहिलेत जगणे..!!
झुरला गरीब आहे ,भाग्यात खाचखळगे
मिळतो कठीण रस्ता, दु :खामधून रमणे..!!
या जीवनात माझ्या, शिकलो कधी झरूनी
ते खोड चंदनाचे, त्यागांमधून झिजणे..!!
ते विरघळून जाणे, शब्दात गोड जपुनी
अस्तित्व जाणले मी, माझ्यात गंध असणे..!!
अपुल्याच षड्रिपुशी, आल्हाद जिंकण्याचा
ही हार मग नव्हे ती, अंतरमधून बघणे..!!
इथली स्वप्ने किती पण, येथेच मी बघितली
साकार व्हायची ती, आहे मनात जमणे..!!
नुसते खरेच जगणे, जिवनात सोसणेही
खोट्यात सांगण्यांचे, मजला नकोच रडणे..!!
