STORYMIRROR

Prashant Kadam

Others

3  

Prashant Kadam

Others

गजानना श्री गणराया

गजानना श्री गणराया

1 min
278

गजानना श्री गणराया

वंदन करितो तुज मोरया


मंगलमय रूप तुझे हे सुंदर

गळ्यात कंठी, भाळी शेंदूर

कटी पितांबर, हाती मोदक

एकदंत तू, लंबोदर मोहक

देवा, एकदंत तू लंबोदर मोहक


गजानना श्री गणराया

वंदन करितो तुज मोरया


जास्वंदीची तव फुले वाहतो

दुर्वांकुराचा हार घालतो

करतो तूझी पुजा विधीवत

तुजला आमचा दंडवत

देवा, तुजला आमचा दंडवत


गजानना श्री गणराया

वंदन करितो तुज मोरया


विराजमान तू या मुषकावर

हिरेजडीत मुकुट शिरावर

अलंकार ते अमुल्य कानन

प्रसन्न करते नुसते दर्शन

देवा, प्रसन्न करते नुसते दर्शन


गजानना श्री गणराया

वंदन करितो तुज मोरया


तूला पाहता दुःख ही सरले

आनंदाला अतिउधाण आले

कृपा तुझी रहावी आम्हावरी

हीच प्रार्थना करतो खरोखरी

देवा, प्रार्थना करतो खरोखरी !!


गजानना श्री गणराया

वंदन करितो तुज मोरया



Rate this content
Log in