गीतांजली
गीतांजली


गीता माझी माता, गीता माझी पिता
धन्य तिची सेवा जनहीता !!
गीता माझी बंधू, गीता माझी भगिनी।
तीच माझे जीवनास उध्दारी !!
गीता माझी गुरू, गीता माझी मित्र।
तिच्याहाती माझ्या जीवनाचे सारथ्य !!
गीता माझा धर्म, गीता माझे कर्म
गीतेविना जन्म व्यर्थची !!
गीता माझे ध्येय, गीता माझी प्रेरणा
गीतेसाठी जीव रणांगणा !!
गीता मज तारु, गीता मज मारू
तयासाठी जीवन अल्पचिया !!
गीता माझा जय, गीता माझा पराजय
तिच्यासाठी हा जीव समर्पित !!