STORYMIRROR

Deorao Chide

Others

3  

Deorao Chide

Others

गिधाड

गिधाड

1 min
242

बालपणात पाहिलेत मी गिधाड

मृत जनावरांचे लचके तोडण्या...

आकाशात थव्या- थव्यांनी भिरभिरतांना..

 पण आज लुप्त झालेत.. कदाचित शरमेने..

या समाजातील गिधाडवृत्ती लोकांना बघून..

कारण इथे मानवच मानवाचे लचके तोडतांना दिसताहेत .....                 

दीनदुबळयांचे नि पिडीत शोषितांचे.. 

रोजचं होतात इथे महीलांवरती अत्याचार...

   पण समाजात वावरतात, मात्र मुखवटे बदलून

करतात मोर्चे, आंदोलने लढण्या स्त्री हक्कासाठी

नि समानतेसाठी.......

आणि पुन्हा या आंदोलनामध्ये ओढतात... 

दिनदुबळयांना, त्यांच्यासाठी लढण्याचा आव आणून...

माजवतात समाजात अराजकता नि अस्थिरता...

आणि हे कफल्लक, रक्तपिपासू गिधाड

मात्र बघतात केवळ तमाशा...


Rate this content
Log in