घटस्थापना
घटस्थापना
1 min
369
घटस्थापना
संस्कारबीज,
परंपरेचे
होऊनी चीज..!१!
अन्याय दूर
करण्या आली,
तेजस्वी दूर्गा
ताकद झाली...!२!
सौख्याचा दिन
प्रेरणा देई,
वाम सारेच
नश्वर होई...!३!
जागर आई
अंबे नावाचा,
चहूदिशांनी
स्वर सत्वाचा...!४!
आदिशक्तीच्या
उदो-उदोत,
आळवू स्वर
शुभ घडोत...!५!
आशिष तिचा
मस्तकी घेऊ,
सदाचाराने
पथ चालवू...!६!
रूप मातेचे
लोभसवाणे,
मनी भुरळ
सौख्याचे गाणे...!७!
संकट टळो
सौख्य नांदावे,
चरणी सदा
लीन रहावे...!८!
