STORYMIRROR

Pandit Warade

Others

3  

Pandit Warade

Others

घरटे

घरटे

1 min
289

मी, माझी बायको आणि माझी मुले

भोवताली असावीत विविधरंगी फुले


नको तिथे आणखी कुणी अध्ये मध्ये

निसर्ग निरीक्षणात नको आणखी वांधे


झाडा वर एक बांधू बंगला शानदार

चिमणा चिमणीचा तिथे करू सत्कार


चंद्र, सूर्य, तारे सारे पाहू उघड्या डोळा

खारुताई, उंदीर, कोल्हे होतीलच गोळा


माणसाच्या गोंधळाचा नको मुळी त्रास

लाभावा फक्त निसर्गाचा तिथे सहवास


साहित्याला गुण द्या
लॉग इन