घरी असणं
घरी असणं
1 min
314
घरी असणं ही
एक कविता आहे
माझ्यासाठी
मनावर अनामिक
कर्तव्याचं ओझं
हे राहिलं ते राहिलं
काहीबाही आठवल्यासारखं
अन् काही तरी विसरल्यासारखं
कविता अधांतराची
कविता अस्वस्थतेची ..
ऊन, पाऊस, थंडी, वादळ
विषाणू, जिवाणू
पराधीन जगण्याचा
श्वास सुकाणू
त्यामुळे
घरी असणं ही
एक कविता आहे
माझ्यासाठी
