STORYMIRROR

Prashant Tribhuwan

Others

4  

Prashant Tribhuwan

Others

घर संसार

घर संसार

1 min
362


काव्यप्रकार - अष्टाक्षरी


कष्ट करून घालते

आई आमची भाकरी,

वेळ प्रसंगी करते

घरी कुणाच्या चाकरी !


         घर नाहीच आम्हाला

         रस्त्यावर राहतोय ,

         टिकवून स्वाभिमान

         बाप आम्हा पोसतोय !


गरिबीच नाही दुःख

भाळी आमच्या लिहिले,

भीक मागताना आम्ही

श्रीमंतांना ही पहिले !


        महासत्ता होणारच

       माझा भारत नक्कीच,

       रस्त्यावर ला माणूस

       मात्र गरीब दुःखीच!


सर्व शिक्षा अभियान

आहे सारे तुझ्यासाठी,

आम्ही भरतोय पोट

झिजवून रस्त्याकाठी!


       संस्काराचा नाही कधी

       तुटवडा अाम्हाकडे,

       संस्कृतीशी आमचीही

       नाळ नेहमीच जुडे!


भाळी आमच्या आहेच

सदा दुःखाचा डोंगर,

तरी नांदतो आमच्या

घरी आनंद सागर!


साहित्याला गुण द्या
लॉग इन