घन ओथंबून आले
घन ओथंबून आले
1 min
309
घन ओथंबून आले
मेघराज गरजले
पावसाच्या थेंबांनी
मन मोहरून गेले १
घननीळ बरसला
सारा निसर्ग सजला
पावसाच्या स्वागतास
अणू रेणू सिद्ध झाला २
घन घन माला येता
तन ओलेचिंब झाले
वरुणाच्या करुणेने
माझी मी नच राहिले ३
वसुंधरा मोहरली
शालू हिरवा ती ल्याली
अंगावर तीने तिच्या
मखमल पांघरली ४
गरजत गरजत
मेघ असे बरसले
सजनाच्या भेटीस
मन माझे आतुरले ५