घन बरसले सुखाचे
घन बरसले सुखाचे


धरणी थकली तापून उन्हात,
चातकाप्रमाणे वाट पाही आज,
कधी येतील मेघ दाटून नभात,
धरणी माता ओढेल साज.
पुन्हा आले ढग दाटून,
पुन्हा गरजेल अंबरातून,
पुन्हा बरसतील जलधारा,
पुन्हा घोंगवेल गार वारा.
शेतकऱ्याची कामे,
सुरु झाली आता,
सुखाने बरसेल,
घनराज आता.
तृप्त झाली धरा,
अंकुर फुटले तिला,
थंडगार वाहे वारा,
आता बरसतील जलधारा.