घे रडून
घे रडून
1 min
209
मिळालंय वेळ तर आजच घे रडून
किती दिवस राहणार आहेस सडून
मिळेना कामधंदा फिरतो गर गर गर
मुलाखती देऊन त्याला येते चक्कर
ओरडू नको आता काय होणार चिडून
किती दिवस राहणार आहेस सडुन
शिक्षण घेतलं खूप शिकला नाही काम
रोजगार केल्याविना मिळेल कसे दाम
नोकरी मिळेना म्हणून घरी आहे पडून
किती दिवस राहणार आहेस सडुन
सोबती असलेले गेले पुढे केली प्रगती
घरातच बसून जगभर करतो भ्रमंती
मिळेल कसे काम बसलंय पाय दुमडून
किती दिवस राहणार आहेस सडुन
कोणी मदत करतील नको ठेवू आशा
सध्या कुणावर ठेवू नकोस भरवसा
काही तरी शिकून घे इतरांकडून
किती दिवस राहणार आहेस सडून
