STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

गेट टुगेदर

गेट टुगेदर

2 mins
4.1K

वय झाले हो आता पन्नाशीचे

मित्र-मैत्रिणी नवे सापडले

होते ते जुनेच १९८२ सालातले

दहावीच्या बॅचचे पुन्हा सारे मिळाले...


अहो वय झाले तरीही या मुलांचा

खोडसाळपणा नाही हो गेला

आलोय समुहात एकत्र व्हाॅट्सअपवर 

यांच्या दंगा मस्तीने पुन्हा आनंद झाला...


बोलतो हसतो खिदळतो भांडतो

हे सारे लहानपणीचेच परत अनुभवतो

खरचंच आमच्यासारखे आम्हीच असू

सारे मैत्रीचे सुख आम्ही उपभोगतो...


शाळेतील ती मस्ती, खोडकरपणा

बाईंचे, सरांचे आम्हाला रागावणे 

सारे सारे परत बोलून धमाल करतो

गतकालीन गप्पात मग मोदाने रमणे...


नुकतेच गेट टुगेदर केले आमच्या बॅचने

सर्व बाई, सर यांना आमंत्रित केले

मुले सारी एकत्र जमली फलटणमध्ये

सर्व खूप खूप खूप आनंदी झाले...


सर्वांची पुन्हा पन्नाशीत नवी मैत्री झाली

बाई, सरांनी आम्हा सर्वांना शाबासकी दिली

सर्वांनी खेळीमेळीने कार्यक्रम पार पाडला

सर्वच मुले-मुली खुशीत, आनंदीत आली...


Rate this content
Log in