STORYMIRROR

शिल्पा म. वाघमारे

Others

3  

शिल्पा म. वाघमारे

Others

गड किल्ले शान अमुची

गड किल्ले शान अमुची

1 min
454

आण बाण शान आहेत

गडकिल्ले महाराष्ट्राची

शिरपेच मायमराठीचे

नि संपत्ती मन्मातेची... १


अजिंक्य तटबंदी नि

बुरुज भक्कम आधार

वास्तुशिल्प अजोड असती

समृद्ध वैभवाची भर... २


ऐतिहासिक नि राजकीय

वारसा मराठी संस्कृतीचा 

दुर्ग अपुले अविभाज्य भाग

या मायभू महाराष्ट्राचा... ३


अतुलनीय भुईकोट तसे

अद्भुतच गिरीदुर्गही

न्याऱ्याच डौलात खडे

जंजिऱ्यासम द्विपदुर्गही...४


 

 श्री छत्रपती शिवरायांनी

शपथ घेऊन स्वराज्याची

शर्थीने लढवला एकेक दुर्ग 

बाजी लावूनी प्राणांची... ५


असामान्य भूषण अपुले

वार झेलुनी खचले झिजले

'अच्छे दिन' गरज काळाची

संरक्षण हेचि कर्तव्य अपुले... ६



Rate this content
Log in