STORYMIRROR

Gangadhar joshi

Others

3  

Gangadhar joshi

Others

गौळण

गौळण

1 min
162

पिचली ग बांगडी 

राधे तुझी पिचली ग बांगडी


रास क्रीडेची लज्जत भारी

कान्हा खेळतो रंग पिचकारी

रंगाने ग भिजला शालू

भिजली रे लुगडी


वृंदावनी त्या मधुर मधुबन

श्रीरंग रंगला मदन मोहन

स्वर मंजुळ उठे वेणु मधुन

ऐकता स्वर ते एकांतातील

लाजली राधा भाबडी 


जमले तिथे कृष्ण संवगडी

अंथरली होती काळी घोंगडी

गोरस अमृत चोरून पिता

भिजली रे गोधडी 


कृष्णा तुझी कन्हया तुझी

भिजली रे गोधडी


पिचली ग बांगडी राधे तुझी

पिचली ग बांगडी


साहित्याला गुण द्या
लॉग इन